Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मंत्री विखे पाटलांच्‍या कंपनीच्या नावाने बनावट दारू; सरपंच पतीकडून विक्री, कारखाना उध्‍वस्‍त

मंत्री विखे पाटलांच्‍या कंपनीच्या नावाने बनावट दारू; सरपंच पतीकडून विक्री, धुळ्यातील कारखाना उध्‍वस्‍त

भूषण अहिरे

धुळे : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (Dhule LCB) बनावट दारू बनविण्याचा मिनी कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा डिस्टिलरी कंपनीचा वापर करून बनावट दारूचा सुरू असलेला धुळ्यातील (Dhule) कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला आहे. (Live Marathi News)

गुजरात (Gujrat) निवडणुकीबरोबरच धुळ्यात देखील 128 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. यातच धुळे तालुक्यातील कावठी शिवारामध्ये सर्रासपणे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व धुळे तालुका पोलिसांना (Police) मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने रात्रीच्या सुमारास पोलिसांनी हा बनावट दारूचा मिनी कारखाना उध्वस्त केला आहे.

१ कोटीचा मुद्देमाल जप्‍त

कारवाईदरम्यान पोलिसांनी जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे या कारवाईतील मुख्य आरोपी तेथील सरपंच महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सरपंच महिलेच्या पतीकडूनच हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता. पोलिसांनी या कारवाईदरम्यान दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी सात जणांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळले असून यातील तिघा आरोपी सध्या फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT