Dhule corporation 
महाराष्ट्र

शिवसेनेकडून भाजपचा निषेध; झेंडा काढण्यावरून आक्रमक

शिवसेनेकडून भाजपचा निषेध; झेंडा काढण्यावरून आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील गांधी पुतळा परिसरामध्ये काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भव्यदिव्य असा तिरंगा झेंडा उभारण्यात आला होता. परंतु काही दिवसांतच तो झेंडा पुन्हा काढण्यात आला आहे. यावर आक्रमक होवून शिवसेनेकडूंन भाजपचा निषेध करण्यात आला. (dhule-news-corporation-oposition-shiv-sena-member-tiranga-flag-strike)

पालिका कार्यालयात फड़कविले झेंडे

पालिका प्रशासनाने तब्बल 80 लाख रुपयांचा खर्च केला आहे. या संदर्भात आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा उचलला आहे. शिवसेनेच्यावतीने महापालिका कार्यालयामध्ये हातांमध्ये तिरंगी झेंडे फडकवत पालिका प्रशासन व भाजपच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत पालिका आयुक्तांच्या कार्यालयामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने धडकले. यासंदर्भात लाखांचा खर्च करून भव्य दिव्य असा तिरंगा झेंडा उभारल्यानंतर तो काही दिवसातच का काढण्यात आला. असा प्रश्न शिवसैनिकांनी यानिमित्ताने विचारला आहे.

भ्रष्टाचाराचा आरोप

तिरंगा झेंडा उभारणीसाठी लागलेल्या 80 लाखांमध्ये पालिका प्रशासन तसेच भाजपतर्फे भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा देखील यावेळी शिवसैनिकांनी आरोप केला आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने 15 ऑगस्टपर्यंत त्याच ठिकाणी उभारलेला झेंडा पूर्ववत लावण्यात न आल्यास शिवसेनेतर्फे आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

SCROLL FOR NEXT