corona 
महाराष्ट्र

धुळेकरांची वाढली चिंता; त्‍या महिला डॉक्‍टराच्‍या कुटुंबियांनाही कोरोना

धुळेकरांची वाढली चिंता; त्‍या महिला डॉक्‍टराच्‍या कुटुंबियांनाही कोरोना

भूषण अहिरे

धुळे : इंग्लंडहून धुळ्यात परतलेल्या महिला डॉक्‍टराचा अहवाल कोरोना पॉझिटीव्‍ह आला होता. यानंतर सदर महिलेल्‍या संपर्कात आलेल्‍यांची तपासणी केली असता महिलेच्‍या संपर्कात आलेल्या कुटुंबियांचे देखील कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे धुळेकरांची आता चिंता वाढली आहे. (dhule-news-Corona-poxitive-family-member-of-the-female-doctor)

गेल्या पंधरा दिवसापूर्वी इंग्लंडहून धुळ्यामध्ये परतलेल्या डॉक्टर महिलेचा कोरोना तपासणीचा अहवाल हा दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्‍ह आला होता. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या तिच्या लहान मुलासह आई- वडिलांचा देखील कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. या महिलेचा विमानतळावर कोरोना तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला होता. त्यानंतर सात दिवसांपूर्वी देखील या महिलेला कोरोना तपासणीचा अहवाल हा निगेटिव्‍ह आला होता. परंतु या महिलेने खासगी लॅबमध्ये आपली कोरोनाची तपासणी करून घेतली असता त्यामध्ये या महिलेचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या पाठोपाठ या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबियांचा देखील कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

प्रतिक्षा ओमायक्रॉनच्‍या रिपोर्टची

विदेशातून आलेल्या महिलेसह तिच्या संपर्कातील तिच्या कुटुंबीयांची देखील ओमायक्रॉन तपासणीचे नमुने पाठविण्यात आले आहेत. या परदेशातून आलेल्या महिलेच्या कुटुंबीयांच्या ओमायक्रॉनच्या अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे. यानुसार आरोग्‍य यंत्रणेकडून उपाययोजनेला सुरवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

Fact-Check: स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज? सरकारची लाडक्या बहिणींसाठी ऑफर?

माझगाव विक्रीकर कार्यालयात ACBची धडक; GST चौकशीची आठ लाखात ‘सेटलमेंट’, लाच घेणाऱ्या उपायुक्तांना ठोकल्या बेड्या

Wednesday Horoscope : वागण्याकडे लक्ष असूद्यात, 4 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान; वाचा आजचे राशीभविष्य

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT