Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : पावसाची संततधार; थाळनेर- होळनांते रस्त्यावरील पूल खचला

पावसाची संततधार; थाळनेर- होळनांते रस्त्यावरील पूल खचला

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात दोन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी- नाल्यांना देखील पूर आले. या दरम्यान (Shirpur) शिरपूर तालुक्यातील थाळनेर-होळनांते रस्त्यावरील (Dhule) पूल रात्रीच्या वेळी खचला. यामुळे पुलावरील वाहतूक खोळंबली आहे. (Maharashtra News)

धुळे जिल्ह्यासह परिसरात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याचे पहावयास मिळाले. शिवाय तापी नदी व उपनद्यांच्या उगम स्थानाच्या पाऊस झाल्याने तापीला पूर आला आहे. तापी नदीचे बॅक वॉटर जाण्यासाठी शिरपूर तालुक्यातील थाळनेर- होळणांते रस्त्यावर पूल उभारण्यात आला आहे. परंतु रात्रीच्या सुमारास पूल अचानक खचला आहे. 

सुदैवाने दुर्घटना नाही  

थाळनेर- होळनांते रस्त्यावरील पूल सकाळी खचलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. परिसरात अधून मधून पाऊस सुरू असून (Rain) काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पुल खचल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. पुलावरून नेहेमीच वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु त्यावेळी सुदैवाने वर्दळ नसल्याने कुठलीही घटना घडली नाही. सध्या वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT