Saam tv
महाराष्ट्र

कुणाल पाटील हे आपले पर्सनल सेक्रेटरी: नितीन गडकरी

काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे आपले पर्सनल सेक्रेटरी: नितीन गडकरी

भूषण अहिरे

धुळे : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज विकासकामांच्या उद्घाटनासाठी धुळे दौऱ्यावर आले होते. यादरम्यान मंत्री नितिन गडकरी यांनी धुळे- चाळीसगाव रस्त्याचे उद्घाटन केले. या उद्घाटनप्रसंगी मंचावर काँग्रेसचे (Congress) आमदार तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचीदेखील हजेरी असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. यावेळी मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान कुणाल पाटील (Kunal Patil) हे आपले प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत; असे म्हटल्यानंतर स्टेजवर बसलेल्या काँग्रेसच्या आमदार कुणाल पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांनी एकच हश्शा उडाला. (dhule news Congress MLA Kunal Patil his private secretary Minister Nitin Gadkari during the speech)

मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे भाषण सुरू असताना मंचावर बसलेल्या उपस्थित मान्यवर आणि पैकी एका मान्यवराने गडकरिंकडे दोन टोलनाक्यामधील अंतर वाढविण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्याला जर सेवा हवे असेल तर पैसे द्यावे लागतील; असे म्हणत आगामी काळात येऊ घातलेल्या योजने संदर्भाची माहिती दिली. आताच्या टोलऐवजी जीपीएस टोल सुरु करण्याची घोषणा देखील केली आहे, हे नवीन टोल सुरू करू तेव्हा नक्कीच या मागणीचा विचार करू असे देखील आश्वासन यावेळी मंत्री गडकरी यांनी मान्यवरांना दिले.

धुळ्यातील रस्‍त्‍याचे कॉंट्रॅक्‍ट दिले तो दिवाळखोरीत गेला

मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलत असताना धुळे (Dhule) जिल्ह्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले तो दिवाळखोरीतच जातो असे म्हणल्यावर मान्यवरांनी हश्या उडवत मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यास समर्थन दिले. तसेच खोटी आश्वासने देऊन आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, लोकांना खोटे आश्वासन देऊन स्वप्न दाखवणारे जे नेते असतात त्यांच्याबद्दल तात्पुरते प्रेम असते व जेव्हा स्वप्न उध्वस्त होतात तेव्हा जनता त्यांनादेखील उद्ध्वस्त केल्याशिवाय राहात नाही, असे म्हणत गडकरी यांनी विरोधकांना टोला लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT