Dhule Congress Saam tv
महाराष्ट्र

महागाई धोरणाविरोधात धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन; टाळ– मृदूंग वाजवत निषेध

भूषण अहिरे

धुळे : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे बघावयास मिळत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून महागाइ विरोधात कॉंग्रेसने (Congress) धुळ्यात आंदोलन केले. (dhule news Congress agitation in Dhule against inflation policy)

वाढत्‍या महागाईचा फटका सर्वच नागरिकांना बसत असल्याने केंद्र सरकारच्या या महागाई धोरणाविरोधामध्ये धुळ्यामध्ये (Dhule) काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. केंद्र सरकारच्या या महागाई धोरणाविरुद्ध धुळ्यामध्ये काँग्रेसच्यावतीने प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या अध्यक्षतेखाली आज धरणे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच डफली, ढोलकी, टाळ व मृदुंग वाजवन केंद्र सरकारच्या महागाई धोरणाचा काँग्रेसच्यावतीने अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला आहे.

घोषणाबाजी करत निषेध

यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सामील झाल्याचे भाघावयास मिळाले असून केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेसतर्फे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या महागाई धोरणाचा यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे निषेध करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांना आताच फोन लावा, त्या अधिकाऱ्याला इथूनच आऊट करतो; मनोज जरांगे कुणावर भडकले?

Accident News: लातूर- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स उलटली; अनेकजण जखमी

PM Mudra Yojana : तरुणांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय 20 लाखांपर्यंतचे कर्ज; असा मिळवता येईल लाभ

SCROLL FOR NEXT