Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात धुळे पोलिसात तक्रार

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात धुळे पोलीसात तक्रार

भूषण अहिरे

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केले. याचे राज्यभर पडसाद उमटताना दिसून येत आहेत. यानुसार (Dhule) धुळे पोलिसात (NCP) राष्‍ट्रवादी युवती कॉंग्रेसच्‍यावतीने तक्रार अर्ज दाखल केला आहे. (Letest Marathi News)

अब्‍दुल सत्‍तार (Abdul Sattar) यांनी काल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले. यामुळे सत्तारांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात धुळ्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानासंदर्भात त्यांच्या विरोधामध्ये धुळे शहर पोलीस (Police) ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सत्तारांवर गुन्हा दाखल करण्यात साठी तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना भेटून या सर्व आक्रमक युवतींनी तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारी अर्ज सुपूर्द केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

SCROLL FOR NEXT