Dhule News Saam tv
महाराष्ट्र

पुष्‍पा धडकला जिल्हाधिकारी बंगल्यावर; आवारातूनच चंदनाच्‍या झाडाची चोरी

पुष्‍पा धडकला जिल्हाधिकारी बंगल्यावर; आवारातूनच चंदनाच्‍या झाडाची चोरी

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात झाडांची सर्रास कत्तल करण्याचे प्रकार वाढले असतांना आता चक्‍क जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानातील झाडेही सुरक्षित राहिलेली नाहीत. रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानाच्या आवारात असलेले मौल्यवान चंदनाचे (Sandalwood) झाड चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. (Dhule Today News)

जिल्हाधिकारी बंगल्यावर पोलिसांचा (Police) चोविस तास जागता पहारा असतो. असे असतानाही पोलिसांच्या हातावर तुरी देवून चक्क चंदनाचे झाड लांबविण्यात चोरट्यांना यश आलेच कसे? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारातून चंदन चोरणाऱ्या या पुष्पाला पकडण्याचे आवाहन आता धुळे (Dhule) शहर पोलिसांसमोर असणार आहे.

सकाळी आले उघडकीस

हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून चोरट्यांची हिंमत वाढल्याचेच यावरून दिसून येत आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT