Bharati Pawar 
महाराष्ट्र

भारती पवार यांनी धरला आदिवासी वाद्याच्‍या तालावर ठेका

भारती पवार यांनी धरला आदिवासी वाद्याच्‍या तालावर ठेका

भूषण अहिरे

धुळे : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार या जिल्‍ह्यातील साक्री येथे आल्‍या होत्या. येथे कार्यक्रमादरम्‍यान त्‍यांनी आदिवासी बांधवासोबत आदिवासी वाद्याच्या तालावर ठेका धरला होता. (dhule-news-central-minister-bharati-pawar-janashirwad-yatra-in-aadiwashi-dance)

भाजपची जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ. भारती पवार या धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बुधवारी सायंकाळी पोहोचल्‍या. त्यांचे आदिवासी बांधवांनी आदिवासी परंपरेप्रमाणे नृत्य सादर करून स्वागत केले. यावेळी मंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील या नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत नृत्य करत आदिवासी गाण्यावर ठेका धरला. त्यावेळी नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांनी देखील मंत्री डॉ. भारती पवार यांच्याबरोबर आदिवासी बांधवांसह नृत्य करीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.

महत्‍त्‍वाकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहचवा

मंत्री भारती पवार यांनी साक्री तालुक्यातील जनतेशी त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांबद्दल तसेच ध्येयांबद्दल माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT