Dhule News NCP Saam tv
महाराष्ट्र

अजित पवारांचा वाढदिवस साजरा करताना राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांत जुंपली; काय आहे कारण वाचा

अजित पवारांच्‍या वाढदिवस साजरा करताना राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांत जुंपली; काय आहे कारण वाचा

भूषण अहिरे

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) जल्लोष साजरा करण्यासाठी एकवटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. (Dhule NCP News)

धुळे (Dhule) शहरातील राष्ट्रवादी भावनाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून या इमारतीच्या उद्घाटनासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष (Sharad Pawar) शरद पवार हे 30 जुलैला धुळ्यात येणार आहेत. याच इमारतीच्या नूतनीकरणासंदर्भात कुठलाही विचार न घेतल्याचे म्हणत डावलल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटात हा वाद उफाळून आला आहे. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शाब्दिक मारा करत मनातील राग बोलून दाखविला.

उद्घाटनाच्या दिवशीही उफाळू शकतो वाद

पक्षप्रमुख शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वीच अशा पद्धतीने पक्षातील वाद उफाळून येत असल्याने उद्घाटनाच्या दिवशी देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत दोन गटात वाद उफाळल्याचे बघावस मिळाले आहे. पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी हे वाद मिटतील का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT