गांजा  
महाराष्ट्र

झोपडीत लपविलेला गांजा जप्‍त

झोपडीत लपविलेला गांजा जप्‍त

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर (Shirpur) तालुका पोलीसांनी छापा टाकून शेतातील झोपडीत लपवून ठेवलेल्या गोणीतील सुमारे ९३ हजार ६०० रुपये किंमतीचा सुका गांजा पोलिसांनी जप्त केला. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित संशयीत पोलीस येण्यापूर्वीच घटनास्थळातून पसार झाला आहे.

शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना सुका गांजा संदर्भात गोपणीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहीतीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील रामा रूमाल्या पावरा याने चिलारे, टिटावापाणी गावाचे शिवारात धरणाजवळ असलेल्या शेतातील झोपडीत सुका गांजा अमली पदार्थाचा साठा केल्याचे लक्षात आले होते. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर झोपडीवर छापा टाकला असता यात झोपडीत ठेवलेल्या गोणीत ९३ हजार ६०० रूपये किंमतीच्या ९.३६० किलो ग्रँम वजनाचा गांजा अंमली पदार्थ मिळुन आला आहे. पुढील कारवाई शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT