Cannabis  saam tv
महाराष्ट्र

गांजाची शेती उध्वस्त; लाखोंचा गांजा पोलिसांनी केला हस्तगत

गांजाची शेती उध्वस्त; लाखोंचा गांजा पोलिसांनी केला हस्तगत

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अतिदुर्गम भाग असलेल्या मांजनीपाडा येथे सुरु असलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलिसांनी उध्‍वस्त करत लाखोंचा माल जप्‍त केला आहे. (dhule Cannabis cultivation devastated Millions of cannabis seized by shirpur police)

शिरपूर (Shirpur) तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या मांजनीपाडा या अतिदुर्गम भागामध्ये रूमाल्या खुमान पावरा याने आपल्या शेतात सर्रासपणे गांजाची (Cannabis) शेती केली होती. याबाबतची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळाली होती. माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी संबंधित ठिकाणी अत्यंत शिताफीने छापा टाकला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती पोलिसांना (Police) आढळून आली आहे.

६५ किलो गांजा जप्‍त

पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त करीत जवळपास ६५ किलो ५८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ज्याची बाजारामध्ये किंमत लाखोंच्या घरामध्ये मानली जात आहे. या कारवाईची भनक लागल्याने शेतमालक रूमाल्या खुमान पावरा हा पसार झाला असून त्याचा शोध धुळे तालुका पोलिस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT