Dhule MNS Saam tv
महाराष्ट्र

Dhule MNS : शिवजयंती दिनी असलेला सीबीएससी बोर्डाचा पेपर रद्द करा; मनसे आक्रमक

Dhule News : शिवजयंतीच्या दिवशी सिबीएससी बोर्डाचा पेपर असल्याने या विरोधामध्ये मनसेतर्फे आक्षेप नोंदवीला आहे. १९ फेब्रुवारीला असलेला दहावी बोर्डाचा पेपर रद्द करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

भूषण अहिरे

धुळे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी असते. तरी देखील सीबीएससी बोर्डातर्फे (Dhule) दहावीचा पेपर ठेवण्यात आला आहे. यामुळे हा पेपर रद्द करण्यात यावा; अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली असून याबाबतचे निवेदन धुळे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. (Breaking Marathi News)

शिवजयंतीच्या दिवशी सिबीएससी बोर्डाचा पेपर असल्याने या विरोधामध्ये (MNS) मनसेतर्फे आक्षेप नोंदवीला आहे. १९ फेब्रुवारीला असलेला दहावी बोर्डाचा पेपर रद्द करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन देखील जिल्हा प्रशासनाला मनसे पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे या मागणीकडे सकारात्मक भूमिकेने बघण्याची मागणी देखील यावेळी मनसे पदाधिकाऱ्यातर्फे करण्यात आली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर मनसे स्टाईल आंदोलन 

दरवर्षी १९ फेब्रुवारीला प्रशासनातर्फे सुट्टी जाहीर करण्यात येते. परंतु यावर्षी सीबीएससी बोर्डातर्फे राज्य शासनाशी संगणमत न करता दहावी बोर्डाची परीक्षा या दिवशी ठेवण्यात आली असल्यामुळे मनसेतर्फे सीबीएससी बोर्डाचा निषेध देखील करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने जर १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी असलेली परीक्षा रद्द केली नाही; तर मनसेस्टाईल आंदोलन करण्याचा देखील इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला व सीबीएससी बोर्ड प्रशासनाला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT