Dhule News Saam tv
महाराष्ट्र

बस चालकाची आत्‍महत्‍या; रात्री जेवण केल्‍यावर उधना बस स्थानकावर आत्महत्या

धुळ्यातील बस चालकाची आत्‍महत्‍या; रात्री जेवण केल्‍यावर उधना बस स्थानकावर आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील बस चालकाने गुजरातमधील उधना बसस्थानकात एसटी बसमध्येच (St Bus) गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. (Breaking Marathi News)

नगावबारी (धुळे) येथील नवीन पाटील (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. शनिवारी (१२ नोव्‍हेंबर) त्यांना सुरत (Surat) येथे ड्युटी होती. त्यानुसार ते धुळे आगारातून धुळे- सुरत बस घेऊन गेले होते. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी रात्री सहकाऱ्यांसोबत जेवण केले. त्यानंतर मात्र त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धुळे- सुरत या बसमध्येच मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफास घेतला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

बसचालक पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. घटनेनंतर गुजरात परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मृत बस चालक पाटील यांचा मृतदेह खाली उतरविला. शवविच्छेदन करून कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह धुळ्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

SCROLL FOR NEXT