महाराष्ट्र

धुळे अधिष्ठातांच्‍या घरावर चोरट्यांचा डल्ला; काही मिनिटच बंद होते घर

धुळे अधिष्ठातांच्‍या घरावर चोरट्यांचा डल्ला; काही मिनिटच बंद होते घर

भूषण अहिरे

धुळे : धुळे येथील शासकिय हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्‍या अधिष्‍ठाता पल्‍लवी सापळे यांच्‍या घरी चोरी झाली. सदर प्रकार गुरूवारी दुपारी घडला असून, याबाबत उशिराने पोलिसात तक्रार दाखल झाली. (dhule-news-burglary-on-the-house-of-Dhule-medical-collage-dean)

शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांचे निवासस्‍थान रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्या ठिकाणी त्यांच्या आई असतात. दुपारच्यावेळी देवदर्शनासाठी त्‍या घराबाहेर गेले असता चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचा फायदा उचलत कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला व घरामध्ये असलेले लाखो रुपयांचे सोन्या- चांदीच्‍या दागिन्यांसह रोकड देखील चोरट्यांनी लंपास केली आहे.

काही मिनिटातच साधला डाव

अधिष्ठाता पल्लवी सापळे या रुग्णालयात सेवेवर होत्‍या. दुपारच्यावेळी त्यांच्या आई घरी होत्या. मात्र थोड्या वेळासाठी त्‍या घर बंद करून मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्‍या. इतक्‍याच वेळात हा सर्व प्रकार घडला आहे. दिवसाढवळ्या अशा पद्धतीने चोरट्यांकडून लाखो रुपयांचा सोन्या– चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मोहाडी पोलिस ठाण्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व पोलिसांनी घटनास्थळी चोरीचा संपूर्ण आढावा घेत चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ, तारीख समोर

Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी फळे खावीत का? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Maharashtra News Live Update: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कुटुंबासह ठाण्यातील आदिवासी पाड्यावरील दिवाळी उत्सवात सहभागी

Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

गोकुळसाठी महायुतीचा ठरला फॉर्म्युला; १ वर्ष भाजपला, शिवसेना-राष्ट्रवादीला किती वर्षे अध्यक्ष मिळणार?

SCROLL FOR NEXT