dhule news saam tv
महाराष्ट्र

कुलदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंचे घेतले नवरीने दर्शन

कुलदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंचे घेतले नवरीने दर्शन

भूषण अहिरे

धुळे : आज शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून शिवसैनिकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. परंतु धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधल्या विटाई येथील युवती सेनेच्या पल्लवी खैरनार या नवरीने आज लग्नाआधी बोहल्यावर चढण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. (dhule news bridegroom visited Chhatrapati Shivaji Maharaj and Balasaheb Thackeray as deities)

लग्न मंडपात प्रवेश करण्यापूर्वी नवरीमुलीतर्फे आधी कुलदैवताचे दर्शन घेतले जाते. त्यानंतरच नवरी मुलगीही लग्न मंडपात प्रवेश करत असते. परंतु साक्री (Sakri) तालुक्यातील पल्लवी खैरनार या युवती सेनेच्या युवतीचे आज लग्न होते. या युवतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुलदैवत म्हणून बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. पल्लवी खैरनार या युवतीचे कुलदैवत दर्शन सध्या संपूर्ण धुळे (Dhule) जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

SCROLL FOR NEXT