Dhule Corporation saam tv
महाराष्ट्र

Dhule: बोगस लसीकरण प्रकरण..आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयातून कागदपत्र ताब्यात

बोगस लसीकरण प्रकरण..आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयातून कागदपत्र घेतले ताब्यात

भूषण अहिरे

धुळे : धुळे महापालिकेच्‍या बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणात मनपा आरोग्‍य अधिकारी यांच्‍या कार्यालयातून धुळे शहर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी काही संशयास्पद कागदपत्र ताब्यात घेतले. यामधून देखील या प्रकरणा संदर्भातील काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिस (Police) प्रशासनातर्फे वर्तविण्यात येत आहे. (dhule news Bogus vaccination case Documents taken from health officer's office)

धुळे (Dhule) महापालिकेच्या बोगस लसीकरण प्रमाणपत्र वाटप प्रकरणात पोलिस प्रशासनातर्फे तपासाला वेग आल्याचे बघावयास मिळत आहे. आज धुळे शहर पोलीस (Dhule Police) ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेल्या आरोग्य अधिकारी महेश मोरे यांच्या कार्यालयाची झडती घेतली आहे. तेथून कागदपत्र हस्‍तगत केले.

शिवसेनेचा उपायुक्‍तावर निशाणा

सदर प्रकरण उचलून धरलेल्या शिवसेनेतर्फे (Shiv Sena) आता धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शिवसेनेच्यावतीने धुळे महापालिकेचे (Dhule Corporation) उपायुक्त गणेश गिरी यांनी हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप लावत त्यांची देखील चौकशी करण्यात यावी; अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये बरबटलेले आणखी मोठे मासे गळाला लागतील का याकडेच संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT