Thelari Community 
महाराष्ट्र

बांगड्यांचा आहेर देण्यासाठी गेलेल्या ठेलारींना अडविले; प्रवेशद्वारावरच आंदोलन

बांगड्यांचा आहेर देण्यासाठी गेलेल्या ठेलारींना अडविले; प्रवेशद्वारावरच आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र ठेलारी महासंघतर्फे गेल्या कित्येक महिन्यांपासून आरक्षित वनचराई जमिनींसाठी वेळोवेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलने देखील करण्यात आले होते. परंतु, उपयोग होत नसल्‍याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्यासाठी गेलेल्या आक्रमक ठेलारिंना पोलिसांनी अडविले असता त्‍यांनी प्रवेशद्वारावरच आंदोलन केले. (dhule-news-Blocking-the-carts-that-went-to-feed-the-bangles-Movement-at-the-entrance)

महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे वनविभागाकडे आरक्षित वनचराईची जमिन उपलब्‍ध करून देण्याची मागणी केली आहे. परंतु फक्त आश्वासनाच्या जोरावर वेळ मारून नेणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आज महाराष्ट्र ठेलारी संघटनेच्यावतीने बांगड्या भेट देण्याचे आंदोलन छेडले होते. वन विभागाच्‍या कार्यालयात गेलेल्या समाज बांधवांना पोलिसांनी वन विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरच अडविले. त्यानंतर या वन विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये ठेलारी बांधवांनी वनविभागाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केले आहे.

तर आता थेट आत्‍मदहन

पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत वन विभागाकडे असलेल्या मागण्या मान्य करून देण्याचे आश्वासन संबंधित आंदोलकांना दिले आले. परंतु त्या आश्वासनानंतर देखील जर वनविभागातर्फे मागण्या मान्य केल्या गेल्या नाही. तर येणाऱ्या १ ऑक्‍टोंबरला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा प्रशासनाला दिला आहे. या आत्मदहनानंतर संबंधित वन विभाग अधिकाऱ्यास जबाबदार धरावे; असे ठेलारी संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

SCROLL FOR NEXT