Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: वारंवार वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेनेचा रास्‍ता रोको

वारंवार वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेनेचा रास्‍ता रोको

भूषण अहिरे

धुळे : उन्‍हाळ्याचे दिवस असताना वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहे. नागरीकांना होत असलेल्‍या कारभाराविरोधात (Dhule News) धुळ्यात उद्धव ठाकरे शिवसैनिक आक्रमक झाले. (Mahavitaran) महावितरणवर धडक देत आंदोलन केले. तसेच रास्‍ता रोको आंदोलन देखील केले. (Tajya Batmya)

वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारा विरोधात धुळ्यात उद्धव ठाकरे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. भर उन्हाळ्यामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड गर्मीचा सामना करावा लागत आहे. याबाबत शिवसेनेतर्फे वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी घेराव घालण्यात आला. वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून झाल्यानंतर या आक्रमक शिवसैनिकांनी थेट रास्ता रोको करून वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध केला.

वीज वितरण कार्यालयासमोरील धुळे– साक्री रोड शिवसैनिकांनी बराच वेळ अडवून धरल्याचे बघावयास मिळाले आहे. वारंवार होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या खंडामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज वितरण विभागातर्फे यासंदर्भात गांभीर्याने दखल घेत वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा; यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या रास्ता रोको दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे देखील बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT