Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : राज्य सरकार विरोधात मराठा कार्यकर्त्यांच्या रास्ता रोको; अजित पवार गटाचे पदाधिकारीही सहभागी

Dhule News : राज्य सरकार विरोधात मराठा कार्यकर्त्यांच्या रास्ता रोको; अजित पवार गटाचे पदाधिकारीही सहभागी

भूषण अहिरे

धुळे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. त्यानुसार धुळ्यात देखील मराठा आंदोलन (Dhule) आक्रमक झाले असून आज या मराठा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलकांमध्ये (Ajit Pawar) अजित पवार गटाचे पदाधिकारी देखील सहभागी झाल्याने चर्चांना उधान आले आहे. (Breaking Marathi News)

मराठा आंदोलकांवर (Maratha Aarkshan) जालन्यात लाठी चार्ज झाला. यानंतर राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र झाले. दरम्यान लाठी चार्जबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र धुळ्यात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सहभाग घेतल्याने चर्चांना उधान आले आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण कार्यकर्ता मेळाव्यासाठी धुळे दौरावर आले असता, राज्य सरकार विरोधात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले असता त्यांनीही रास्ता रोकोत सहभागी झले. 

सरकारविरोधात घोषणाबाजी 

मराठा आंदोलकांनी मुंबई- आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी देखील आंदोलकांमध्ये सहभाग नोंदवत रास्ता रोकोत घोषणाबाजी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रावरील ढग गायब, पाऊस गेला कुणीकडे? पुढील २ दिवस कसं असेल हवामान?

PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

Maharashtra News Live Update: मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा

Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग?

यंदा 'फादर्स डे' कधी आहे? वडिलांना खूश करणाऱ्या 3 बेस्ट आयडिया

SCROLL FOR NEXT