BJP 
महाराष्ट्र

धुळ्यात भाजपचा शंखनाद; मंदिर खुले करण्यासाठी राम मंदिराबाहेर आंदोलन

भाजपचा शंखनाद; मंदिर खुले करण्यासाठी राम मंदिराबाहेर आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यातील राम मंदिराबाहेर भाजपतर्फे मंदिर खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून भाजपने राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न करत मंदिर खुले करण्याची मागणी केली. (dhule-news-BJP's-shout-Movement-outside-the-Ram-temple-to-open-the-temple)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिर राज्य सरकारतर्फे बंद ठेवण्यात आले आहेत. याचा विरोध करीत भाजपतर्फे आज धुळ्यातील राम मंदिराबाहेर शंखनाद आंदोलन करून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मग मंदिरच बंद का?

एकीकडे बाजारपेठा त्याचबरोबर सर्व उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. तसेच दारूची दुकाने, बियर बार, हॉटेल हे देखील उघडण्यात आले. दुसरीकडे मात्र मंदिर उघडण्यास अद्यापही प्रशासनातर्फे सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप भाजपतर्फे लावण्यात आला आहे.

सरकारचा सद्‌बुद्धी येवो

राज्य सरकारच्या या भूमिकेचा विरोधामध्ये व सरकारला जागे करण्यासाठी मंदिरे उघडण्यासाठी ईश्वरातर्फे महाविकास आघाडी सरकारला सद्‌बुद्धी येवो यासाठी धुळ्यामध्ये शंखनाद आंदोलन भाजपतर्फे करण्यात आले आहे. या शंखनाद आंदोलनादरम्यान भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT