dhule bjp 
महाराष्ट्र

धुळ्यात भाजपकडून भास्कर जाधव यांच्या प्रतिमेस मारले जोडे

धुळ्यात भाजपकडून भास्कर जाधव यांच्या प्रतिमेस मारले जोडे

Rajesh Sonwane, साम टिव्ही ब्युरो

भूषण अहिरे

धुळे : विधानसभेत गैरकृत्य केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर याचे पडसाद धुळ्यात उमटण्यास सुरुवात झाली असून आज भाजपच्‍यावतीने भास्‍कर जाधव यांच्‍या प्रतिमेस जोडे मारा आंदोलन करत निषेध करण्यात आला. (dhule-news-bjp-strike-and-bhaskar-jadhav-image-jode-mar-aandolan)

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आरक्षणावर बोलू दिले नाही. म्हणून त्याचा जाब विचारत असताना धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्यासह बारा आमदारांचे निलंबन करून सरकारने भाजपचे संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी करत, त्‍याच्‍या निषेधार्थ धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ठाकरे सरकारचा निषेध केला.

तालिकाध्‍यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्याची प्रतिमा जाळून निषेध नोंदवला आहे. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत आक्रोश व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT