Jaykumar rawal 
महाराष्ट्र

आमदारांचे निलंबन..जयकुमार रावल समर्थकांकडून रास्ता रोको

आमदारांचे निलंबन..जयकुमार रावल समर्थकांकडून रास्ता रोको

Rajesh Sonwane

भूषण अहिरे

धुळे : ओबीसी प्रश्नांवर आक्रमक झालेल्‍या भाजपच्या बारा आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन केले. या आमदारांमध्‍ये शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांचा देखील समावेश असून त्‍यांच्या समर्थकांनी भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत धुळे– शिंदखेडा रस्त्यावर काही काळ रास्ता रोको करण्यात आला. (dhule-news-bjp-mla-dismiss-vidhanparishad-jaykumar-rawal-suporters-road-block)

पावसाळी अधिवेशाला सुरवात झाली असून, अधिवेशनाच्‍या पहिल्‍या दिवशी भाजप आमदारांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडयला सुरवात केली. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी बाजू मांडू न दिल्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले. हे निलंबन एक वर्षासाठी आहे. या निलंबनामुळे ठिकठिकाणी पडसाद उमटत आहेत.

भाजप कार्यकर्ते आक्रमक

निलंबित बारा आमदारांमध्ये शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने धुळे शिंदखेडा बाभळे फाट्यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच काही काळ या ठिकाणी रास्ता रोको देखील भाजपचा कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आला आहे. तसेच यावेळी ठाकरे सरकार विरोधात घोषणा बाजी देखील करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT