Bharati Pawar 
महाराष्ट्र

बठ्ठा काळजी लेजा..आदीवासी भाषेत भारती पवार यांचे आपुलकीचे बोल

बठ्ठा काळजी लेजा..आदीवासी भाषेत भारती पवार यांचे आपुलकीचे बोल

साम टिव्ही ब्युरो

तळोदा : तुमची भारती तुमचा आशीर्वाद घ्यायला आली आहे, तुमची माया- तुमची छाया माझ्यावर राहू द्या अशी साद घालत 'बठ्ठा काळजी लेजा..' असे आपुलकीचे बोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी काढले. (dhule-news-bjp-janashirwad-yatra-bharati-pawar-selfy-aadivashi-women-and-tolk-aadivashi-language)

भाजपची जनआशीर्वाद यात्रेदरम्यान तळोद्यातील आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला मेळावा झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रदेश संयोजक किशोर काळकर, प्रदेशाध्यक्ष अशोक उईके, जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, लक्ष्मणराव सावजी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, प्रदेशसदस्य राजेंद्रकुमार गावीत, प्रकाश गेडाम, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

लोकनृत्यावर ठेका

राज्यमंत्री भारती पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच आदिवासी बांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक वाद्य वाजवीत लोकनृत्य सादर केले. यावेळी राज्यमंत्री पवार यांनी देखील त्यांच्यासोबत पारंपरिक नृत्यावर ठेका धरला. यावेळी खासदार हिना गावीत, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी त्यांना साथ दिली.

समस्‍या सोडवण्यासाठी तुमचे पालकत्व घेते

राज्यमंत्री पवार म्हणाल्या, की मोदी सरकारने महिलांसाठी उज्ज्वला गॅस, सुकन्या समृद्धी योजना आणून दिलासा दिला आहे. समस्या सोडवण्यासाठी मी तुमचं पालकत्व घेत असून त्यासाठी नेहमीच इथे येत राहील असे सांगितले. आमदार राजेश पाडवी म्हणाले की, मोदी शासनाने संपूर्ण आदिवासी महिलांचा सन्मान केला आहे. तसेच आदिवासी बांधवांचे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाहीत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. आदिवासी विकास मंत्री जिल्ह्यातील असून देखील लाभार्थ्यांना खावटीची मदत मिळायला उशीर झाला, त्यामुळे याबाबत तुम्ही मंत्रींना जाब विचारायला पाहिजे; असेही पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

Tariff: वस्त्रोद्योग, हिरे, दागिने अन् बरंच काही; टॅरिफचा भारताला बसणार फटका; या क्षेत्रांवर होणार परिणाम

Liver Kidney Detox : यकृत अन् मूत्रपिंड डिटॉक्स करायचेय? ८ फळांचा रोजच्या आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT