Nagar Panchayat Election Result 2022 saam tv
महाराष्ट्र

Nagar Panchayat Election: भाजपचा ऐतिहासिक विजय; साक्री नगरपंचायत सत्तापरिवर्तन

भाजपचा ऐतिहासिक विजय; साक्री नगरपंचायत सत्तापरिवर्तन

भूषण अहिरे

धुळे : साक्री नगरपंचायतीच्या सर्व १७ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये १७ पैकी ११ जागा भाजपने काबीज करत दणदणीत विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला (Congress) देखील एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) भोपळा देखील फोडता आला नाही. (dhule news BJP historic victory Sakri Nagar Panchayat coup in election result)

धुळे जिल्‍ह्यातील साक्री नगरपंचायतीसाठी (Sakri Nagar Panchayat Election Results) झालेल्‍या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. साक्री नगरपंचायतीवर आतापर्यंत जवळपास पंचवीस ते तीस वर्षांपासून साक्री नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते, परंतु या वेळी भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय काबीज केला आहे.

साक्री नगरपंचायतमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय

साक्री नगरपंचायतीमध्‍ये गेल्‍या 25 वर्षांपासूनची सत्ता असलेले ज्ञानेश्वर नागरे यांना मोठा धक्का बसला आहे. नगरपंचायतीच्‍या १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत भाजपने मुसंडी मारली आहे. एकेकाळी साक्री नगरपंचायतीवर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा देखील फोडण अशक्य झाले.

भाजप ११

शिवसेना ४

काँग्रेस १

अपक्ष १

राष्‍ट्रवादी ०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

Train Accident: भीषण रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली; ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका, मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

SCROLL FOR NEXT