Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Chhagan Bujbal: छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपकडून निषेध

छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपकडून निषेध

भूषण अहिरे

धुळे : एका कार्यक्रमा दरम्यान माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विद्येची देवता सरस्वती यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद धुळ्यात (Dhule) उमटताना बघायला मिळाले. धुळ्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा (BJP) भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. (Dhule Today News)

सरस्वती देवीच्या पुतळ्यासमोर उभे राहून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वक्तव्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा केला जात असताना अशा पद्धतीने देवीचा अपमान (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला असल्याचे भाजपच्या निषेधकर्त्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करून त्यांच्या वक्तव्याचा भाजपतर्फे निषेध करण्यात आला आहे.

भाजपचा अनोखा प्रश्‍न

विद्येची देवता सरस्वती यांना न मानता मग मंत्री छगन भुजबळ यांच्या बायकोच मानावे का? असा प्रश्न देखील यावेळी संतप्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांतर्फे हिंदूंचा अपमान केला जात असल्याचे यावेळी भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना लक्ष्मी प्राप्तीसाठी सुसंधी मिळतील, तर कोणाला होईल आजाराचे निदान, तुमची रास काय?

Raosaheb Danve: खरंच नेते म्हणायचं का? फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ

Daily Horoscope: आजचा शुभ दिवस देणार बरंच काही; वाचा तुमचे राशीभविष्य

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

SCROLL FOR NEXT