flood affected 
महाराष्ट्र

पुरग्रस्‍त नागरिकांना धुळ्याहून मदत रवाना

पुरग्रस्‍त नागरिकांना धुळ्याहून मदत रवाना

भूषण अहिरे

धुळे : राज्‍यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला होता. यात अनेकांचे संसार उध्‍वस्‍त झाले. या पुरग्रस्‍तांना राज्‍यभरातून मदतीचा हात दिला जात आहे. याच अनुषंगाने पुरग्रस्‍तांना धुळ्यातून मदत रवाना झाली आहे. (dhule-news-Assistance-sent-to-flood-affected-citizens-from-Dhule)

राज्यात बहुतांश ठिकाणी पुरामुळे नागरिकांची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. पुराचा फटका बसल्यामुळे बहुतांश संसार हे उघड्यावर आले असून सध्या त्यांच्या खाण्यापिण्यापासून सर्वच गोष्टींची पंचायत झाली आहे. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांचे फारच हाल होत आहेत.

गहू, तांदूळ, कपडे रवाना

पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी धुळे, नंदुरबार त्याचबरोबर जळगाव या तीनही जिल्ह्यातून पुरग्रस्तांना टायगर ग्रुपतर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. धुळ्याहून पूरग्रस्त नागरिकांना ४० टन गहू, ३० टन तांदूळ, २०० जोड चपला, १२५० महिला– लहान बालके त्याचबरोबर पुरुषांसाठी अंगावरची नवी वस्त्र पाठविण्यात आली आहे. ही मदत वाहनांमध्ये रात्री धुळ्याहून रवाना झाली असून टायगर ग्रुपच्या समाजसेवक बांधवांच्या हस्ते पूरग्रस्त ठिकाणी गरजूंना त्याचे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: थायलंडमध्ये मध्यरात्री हरवली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री; सोलो ट्रिपमधील धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली...

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला वेग; फिरोज शेख यांच्यावरील आरोप मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी फेटाळले

SCROLL FOR NEXT