लग्नाचा बार 
महाराष्ट्र

आली समीप लग्नघटीका..आता उडणार लग्नाचा बार; यंदा दहा मुहूर्तही निघाले अधिक

आली समीप लग्नघटीका..आता उडणार लग्नाचा बार; यंदा दहा मुहूर्तही निघाले अधिक

साम टिव्ही ब्युरो

धुळे : कोरोना संकटामुळे गेले दीड- पावणेदोन वर्षे सर्वच कार्यक्रमांना लगाम घातला गेला होता. विवाह सोहळेही यातून सुटले नाहीत. दरम्यान, आता कोरोनाचे हे संकट काहीसे दूर झाल्याने विवाह सोहळ्यांचीही धामधूम पाहायला मिळणार आहे. आता दिवाळीनंतर नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान विवाहासाठी मुहूर्त असल्याने अनेक मंगल कार्यालयांच्या तारखाही बुक होऊ लागल्या आहेत. विशेष म्‍हणजे यंदा दहा मुहूर्त देखील जास्‍तीचे आले आहेत. (dhule-news-After-Diwali-the-date-of-marriage-is-till-July)

कोरोना विषाणू संसर्गाच्या महाभयानक संकटाने सर्वच व्यवहारांना लगाम लागला. अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. मात्र, कोरोनाचे हे संकट काहीसे दूर झाल्याने आता पुन्हा गाडी रुळावर येऊ पाहत आहे. दिवाळीच्या धामधुमीनंतर कोरोनाचा हा संसर्ग असाच नियंत्रणात राहिला तर रुळावर आलेल्या गाडीला वेग मिळणार आहे. त्यामुळे गेले दीड-पावणेदोन वर्षे रखडलेल्या विवाह सोहळ्यांची धामधूमही पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

मंगल कार्यालयांचे कुलूप उघडणार

कोरोनाच्या संकटातही काही तरुण-तरुणींचे विवाह सोहळे मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत, घरच्याघरी पार पडले. या काळात मंगल कार्यालयांना तर कुलुपच होते. त्यामुळे या व्यवसायाशी निगडित सर्वांचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. दरम्यान, आता पुन्हा या व्यवसायालाही उभारी येण्याची अपेक्षा असल्याने मंगल कार्यालये, लॉन्समध्ये स्वच्छतेसह रंगरंगोटी सुरू आहे. केटरर्स, मंडप व्यावसायिक, बँडसह इतर वाजंत्री, सजावटकार यांनाही यंदा लग्नांची धामधूम सुरू होऊन व्यवसाय रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे.

जुलैपर्यंत मुहूर्त

दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात तुलसीविवाहानंतर लग्नाची धामधूम सुरू होईल. विवाहासाठी जुलैपर्यंत मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाहेच्छू वधू-वर कुटुंबीयांकडून लग्नासाठी लगबग सुरू आहे. मंगल कार्यालयांमध्ये बुकिंगसाठीही धावपळ सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT