Dhule Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: लाच न स्‍वीकारताच पलायन; तरीही तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

लाच न स्‍वीकारताच पलायन; तरीही तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : लाच मागितली, ती स्वीकारण्याची तयारीदेखील झाली पण अचानक संशय आल्याने तलाठ्याने चारचाकी बाहेर काढून (Dhule News) धुळ्याकडे वळवली. संशयित पळतोय हे लक्षात आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करून महामार्गावर त्याला ताब्यात घेतले. (Maharashtra News)

चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने खंबाळे (ता. शिरपूर) येथील तलाठी सुऱ्या पायल्या कोकणी (वय ५३) याला ३१ जानेवारील दुपारी लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदाराचे वडील २०१७ मध्ये मृत झाल्याने त्यांच्या शेत जमिनीला वारस लावण्याची कार्यवाही प्रलंबित होती. त्यामुळे संबंधित सातबाऱ्यावर वारस लावण्यासाठी त्यांनी तलाठी कोकणी याची भेट घेतली.

सात हजार रूपयांची मागणी

आवश्यक कागदपत्रांसह अर्ज व सोबत सात हजार रूपये इतक्‍या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधून तक्रार दिली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खात्री केल्यानंतर मंगळवारी सापळा रचला. तडजोडीअंती ठरलेली सहा हजार रुपयांची रक्कम घेण्यासाठी कोकणी याने तक्रारदाराला बोलावले.

संशय आला अन्‌

मात्र त्याला सापळ्याचा संशय आल्याने पैसे न स्वीकारताच कार घेऊन शिरपूरच्या दिशेने निघून गेला. पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे लाचलुचपत विभागाच्‍या पथकाने सापळा रचत सदर कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेसाठी वरदान आहे 'हे' फळ; आठवड्यातून एकदा तरी खा, पार्लरशिवाय मिळेल चमकदार त्वचा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

TMKOC: 'तिच्या सासरचे नाही...'; 'तारक मेहता'मध्ये कधीच परत येणार नाही दया बेन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Petrol Diesel Price Hike: सिलेंडरनंतर प्रीमियम पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, वाचा नवे दर

Chia seeds: या व्यक्तींनी चुकूनही चिया सिड्सचं सेवन करू नये!

SCROLL FOR NEXT