zp school 
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा झाली हायटेक; विद्यार्थ्यांच्‍या गोडीसाठी अनोखा उपक्रम

जिल्हा परिषद शाळा झाली हायटेक; विद्यार्थ्यांच्‍या गोडीसाठी अनोखा उपक्रम

भूषण अहिरे

धुळे : कोरोनात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचा शाळेपासून असलेला लगाव हा काहीसा कमी झाला. हे जाणवत असताना विद्यार्थ्यांना शाळेची असलेली गोडी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी धुळे तालुक्यातील आर्णी गावच्या जिल्हा परिषद शाळा प्रशासनातर्फे अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. (dhule-news-aarni-ZP-school-became-high-tech-Unique-activities-for-the-students)

कोरोनामुळे (Corona) मागील दीड ते दोन वर्ष सर्व शाळा (School) बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. यामुळे शाळा व विद्यार्थी हे दोघेही एकमेकांपासून चांगलेच दुरावले होते. एवढ्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचा शाळेपासून असलेला लगाव हा काहीसा कमी झाला असल्याचे जाणवत असताना विद्यार्थ्यांना शाळेची असलेली गोडी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी धुळे (Dhule) तालुक्यातील आर्णी गावच्या जिल्हा परिषद शाळा (Zp School) प्रशासनातर्फे अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.

वायफाय कनेक्‍ट

जिल्हा परिषदेच्या आर्णी शाळा प्रशासनातर्फे शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी; यासाठी शाळेत एलएडी बसवण्यात आल्या आहेत. त्यांना वायफाय देखील जोडण्यात आले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे (Education) धडे दिले जात आहेत.

विद्यार्थ्यांची आवड जोपासली

विद्यार्थ्यांना टीव्हीवर बघितलेले सर्व काही लक्षात राहते. विद्यार्थ्यांना टीव्ही बघण्यात जास्त रुची असल्याचे जानवल्यामुळे शाळा प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी ही हायटेक पद्धत वापरून शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती शाळा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT