Dhule Corona Updates saam tv
महाराष्ट्र

Corona: चोवीस तासात धुळ्यात नवीन २५८ कोरोनाबाधित; तिसऱ्या लाटेतील पहिला मृत्‍यू

चोवीस तासात धुळ्यात नवीन २५८ कोरोनाबाधित; तिसऱ्या लाटेतील पहिला मृत्‍यू

भूषण अहिरे

धुळे : गेल्या चोवीस तासात धुळ्यात २५८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. यात तिसऱ्या लाटेतील (Corona Third Wave) पहिला मृत्‍यू झाला आहे. (Dhule Corona News: 258 new corona in Dhule and first death in the third wave)

धुळे (Dhule) शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आला आहे. परंतु दिलासादायक बाब म्‍हणजे तिसरी लाट सुरू झाल्‍यानंतर कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झालेला नव्‍हता. मात्र, सोमवारी (ता.२४) हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान सडगाव येथील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला.

आतापर्यंत ६७३ बळी

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची (Corona) संख्या वाढत आहे. सोमवारी नव्याने २५८ कोरोनाबाधितांचीही भर पडली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडाही ४९ हजार ३३३ वर पोहोचला. दरम्यान, सोमवारी सडगाव येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींचा आकडा एकने पुढे सरकून तो ६७३ वर पोहोचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT