Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: तरुणांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी भारतभर पदयात्रा; तरुणाचा २१०० किमीचा पायी प्रवास

तरुणांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी भारतभर पदयात्रा; तरुणाचा २१०० किमीचा पायी प्रवास

भूषण अहिरे

धुळे : तरुणांना नोकरी न मिळाल्यानंतर येणाऱ्या नैराश्यातून तरुण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. याच नैराश्यातून तरुणांना बाहेर (Dhule News) काढण्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी उत्तर प्रदेश येथील तरुणाने पदयात्रेच्या माध्यमातून तरुणांमध्ये प्रबोधन करण्याचा संकल्प केला आहे. आत्तापर्यंत 2100 किलोमीटर अंतर पायी चालत या तरुणाने नैराश्यात असलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी ही पदयात्रा सुरू केली आहे. (Maharashtra News)

पूर्ण भारतभर अशाच पद्धतीने तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून हा तरुण पाई फिरत आहे. या तरुणाने ही पदयात्रा (Madhya Pradesh) मध्यप्रदेश येथून सुरू केली असून सध्या तो धुळ्यामध्ये पोहोचला आहे. तसेच यापुढे देखील तो (Mumbai) मुंबईच्या दिशेने निघाला असून संपूर्ण भारतभर हे प्रबोधन करण्यासाठी तो फिरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्‍वतः करत होता भरतीसाठी प्रयत्‍न

हा तरुण स्वतः पोलीस भरतीत त्याचबरोबर आर्मीत भरती होण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले. परंतु, वयोमर्यादा संपल्यानंतर नैराश्यात न जाता आपल्यासारख्या इतर नैराश्यात असलेल्या तरुणांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी या तरुणाने ही पदयात्रा सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT