धुळे : धुळे शहरातील औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) या ठिकाणी संजय सोयाबिन ऑइल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना काल रात्री साडेआठ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे. कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण यात गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या संपूर्ण घटनेचा तपास मोहाडी पोलिसांकडून करण्यात येत असून, या दुर्दैवी घटनेमध्ये जखमी झालेल्या दोनही कर्मचाऱ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय सोयाबिन ऑइल कंपनीमध्ये काल सायंकाळच्या सुमारास एका टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल साठवण्यात आले होते. त्याच टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती कामगारांकडून मिळाली आहे. याच दरम्यान स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एमआयडीसीमधील घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनेतील जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलवणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.