Breaking : धुळ्यात उपोषणकर्त्या वृद्धाचा मृत्यू; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष! SaamTvNews
महाराष्ट्र

Breaking : धुळ्यात उपोषणकर्त्या वृद्धाचा मृत्यू; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!

तीन दिवसांमध्ये प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या वृद्ध दांपत्याची साधी विचारणा करण्यासाठी देखील फिरकला नसल्याचा नातेवाईकांचा आरोप

भूषण अहिरे

धुळे : उपोषणाला बसलेल्या वृद्ध दांपत्यापैकी ७१ वर्षीय वृद्ध आजोबांचा उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने मृत्यू झाल्याची घटना धुळी शहरात घडली आहे. तर वृद्ध आजींची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मुलीचे लग्न झालेले असताना देखील तिच्या नवऱ्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्यावरून वाद सुरू होता आणि या संदर्भात प्रशासनातर्फे न्याय मिळावा या हेतूने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याचे उपोषण सुरु होते. (Dhule Latest News Death of a old man due to hunger strike)

उपोषणादरम्यान आजोबांचा मृत्यू झाला असून आजी देखील मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर येत आहे. सुधन्वा भदाने व त्यांच्या धर्मपत्नी रंजना भदाणे हे वृद्ध दाम्पत्य गेल्या 14 तारखेपासून आपल्या मागण्यांसाठी व प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी आमरण उपोषणास बसले होते. तीन दिवसांच्या उपोषणानंतर दोघांचीही प्रकृती खालावली होती.

या तीन दिवसांमध्ये प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या वृद्ध दांपत्याची साधी विचारणा करण्यासाठी देखील फिरकला नसल्याचा आरोप मृत आजोबांच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी संबंधित दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. तर, आजींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

SCROLL FOR NEXT