Dhule Guardian Minister Jayakumar Rawal  Mid Day
महाराष्ट्र

Dhule Guardian Minister: तब्बल २५ वर्षांनंतर धुळे जिल्ह्यातील मंत्र्याच्या गळ्यात पडली पालकमंत्रिपदाची माळ

Dhule Guardian Minister: धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आपली पक्षश्रेष्ठींनी निवड केल्याबद्दल जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले आहेत.

Bharat Jadhav

भूषण अहिरे, साम प्रतिनिधी

राज्याच्या पालकमंत्री पदाची यादी अखेर जाहीर झाली. धुळे जिल्ह्यासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आलीय. यामुळे धुळे जिल्ह्याला तब्बल २५ वर्षानंतर जिल्ह्यातीलच मंत्र्याच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडलीय. मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आपली पक्षश्रेष्ठींनी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.

यापूर्वी मंत्री दादा भुसे त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन तसेच अब्दुल सत्तार हे पालकमंत्री म्हणून लाभले होते, परंतु हे सर्व पालकमंत्री जिल्ह्याबाहेरील असल्यामुळे याचा परिणाम जिल्ह्यावर देखील होताना दिसून येत होता, परंतु यावेळी मात्र धुळे जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून जयकुमार रावल यांच्या निमित्ताने जिल्ह्यातीलच मंत्री लाभल्यामुळे आता जिल्ह्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT