Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News : लग्न समारंभातून चोरलेले २६ तोळे सोने हस्तगत; चोरटे मात्र फरार

Dhule News : रिसॉर्टमधील कार्यक्रम सुरू असताना नवरीचे आणि कुटुंबातील सदस्यांचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. यामुळे लग्न समारंभात गोंधळ उडाला

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यामध्ये झालेल्या एका लग्न समारंभातून नवरीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर पोलिसात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली होती. यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेश येथून धुळ्यातील लग्नामधील चोरीचा उलगडा केला आहे. यात लग्न समारंभातून चोरलेले सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र चोरटे फरार झाले आहेत. 

धुळे शहरातील कृष्णा रिसॉर्ट येथे २ डिसेंबर रोजी लग्न समारंभ पार पडला. या लग्न समारंभात नवरीचे २६ तोळे सोने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. कृष्णा रिसॉर्टमधील कार्यक्रम सुरू असताना नवरीचे आणि कुटुंबातील सदस्यांचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. यामुळे लग्न समारंभात गोंधळ उडाला होता. 

पोलिसांचे पथक मध्य प्रदेशमध्ये मुक्कामी 

दरम्यान या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी रिसॉर्टमधील सीसीटीव्ही तपासात चोरीला गेलेल्या सोने चोरट्यांचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी सर्व तपास करत असतांना तपासादरम्यान चोरी करणारी गँग हि मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाले होते. यानंतर काही दिवस येथे हे चोरटे मुक्कामी राहिले होते. 

झोपडीतून ऐवज हस्तगत 

मोहाडी पोलिसांनी नऊ दिवस मुक्कामी राहून राजगड जिल्ह्यात गुप्त तपास करत चोरीस गेलेला २६ तोळे सोन्याचा ऐवज गुलखेडी गावाजवळील जंगलातील एका झोपडीतून हस्तगत केला आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र आरोपींना पोलिसांची चाहूल लागल्याने संबंधित आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. आता या चोरट्यांचा तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

लिंबू सरबत की ऊसाचा रस, कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य?

Maharashtra Live News Update : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा

Badshah Controversy: बादशाहच्या अडचणी वाढ; महिला आयोगाकडून अटकेची मागणी, कॉन्सर्टवर बंदीचा इशारा

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून 'तिचा' पत्ता कट्ट; 2 महिन्यात प्रवास संपला, धक्कादायक एलिमिनेशन

SCROLL FOR NEXT