Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: नात्याला काळीमा! मामाकडून 4 वर्षीय भाच्याची हत्या, परिसरात खळबळ

Dhule Crime News: धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळ्यात एका व्यक्तीने त्याच्या ४ वर्षीय भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भूषण अहिरे

Dhule Crime News in Marathi:

धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळ्यात एका व्यक्तीने त्याच्या ४ वर्षीय भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

चिमुकला घराबाहेर अंगणात खेळत होता. मात्र, काही वेळेनंतर घरातील सदस्यांना दिसलाच नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. त्यावेळी चिमुकला बाहेर कुठेही सापडला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी शेजारीच असलेल्या बाथरूममध्ये पाहणी केली.

त्यावेळी या चिमुकल्याच्या मामा त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून शेजारी बसल्याचा आढळून आला. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने चिमुकल्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी चिमुकल्यास मृत घोषित केले.

मामानेच अशा प्रकारचे कृत्य का केले, याबाबत सध्या परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. या विचित्र घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित मामाच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला ताब्यात देखील घेतलं आहे.या मामाने अशा प्रकारचे कृत्य का केले, याचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

बीडमध्ये १४ वर्षीय ३ शाळकरी मुलांनी ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित मुलांना ताब्यात घेतले आहे. तसेत पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पीडित मुलगी कुटुंबासोबत राहत होती. तिचे वडील शहरात रिक्षा चालवतात. तर आई गृहिणी आहे. तसेच आरोपी मुले पीडित मुलीच्या परिसरातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT