Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: तरुणाच्या खूनाचा धक्‍कादायक उलगडा; मारेकऱ्यांना पोलिसांनी केले जेरबंद

तरुणाच्या खूनाचा धक्‍कादायक उलगडा; मारेकऱ्यांना पोलिसांनी केले जेरबंद

भूषण अहिरे

Dhule News: शिरपूर तालुक्‍यातील तरडी येथे चार दिवसांपुर्वी खून झालेल्‍या मृतदेहाचा तपास पोलिसांनी केला. कोणताही पुरावा नसताना तपास करणे पोलिसांसमोर (Police) आव्‍हान होते. परंतु, या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्‍यात घेतले आहे. (Maharashtra News)

चार दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यातील तरडी येथे अज्ञात इसमाचा ओडणीच्या सहाय्याने हात बांधून गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहा संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती नसताना देखील थाळणेर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या विचित्र खुनाचा (Crime News) छडा लावला असून, या संदर्भात तीन आरोपींच्या देखील पोलिसांनी मूसक्या आवळल्या आहेत,

अनैतिक संबंधातून खून

मुकेश राजाराम बारेला (वय ३०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो मध्यप्रदेश येथील बडवानी इथला रहिवासी असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. मृत मुकेश बारेला याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्यामुळे या अनैतिक संबंधांतून तिच्या पतीचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात थाळणेर पोलिसात या तिघां विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

SCROLL FOR NEXT