Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: धुळे पुन्हा हदरले; गोळ्या झाडून चाक़ूने गळ्यावर वार करत हत्या

धुळे पुन्हा हदरले; गोळ्या झाडून चाक़ूने गळ्यावर वार करत हत्या

भूषण अहिरे

धुळे : हत्येच्या घटनेमुळे धुळे पुन्हा एकदा हादरले आहे. तालुक्यातील नेर गावाजवळ असलेल्या उभंड- पिंपरखेड (Dhule News) येथे एकाची पिस्तूलातून गोळी झाडून तसेच चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या (Crime News) केल्याची घटना घडली आहे. (Live Marathi News)

धुळे येथील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच (Police) पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पिस्तूलचे मॅगझिन व गोळीचा भाग मिळून आला असून, यशवंतराव बागूल असे मृत तरुणाचे नाव आहे.

जमिनीच्या वादातुन हत्या

घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस तपास यंत्रणेसह घटनास्थळी रात्री दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरू होता. या हल्ल्यात मारेकऱ्यांमध्ये 4 ते 5 जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनास्थळाचा पंचनामा, नमुने घेण्यासह पोलीस कारवाई उशिरापर्यंत सुरु होती, जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Breaking: विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, २२ बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Maharashtra News Live Update: पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! प्रवीण तरडेंचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'देऊळ बंद -2'ने कमावले तब्बल 'इतके' कोटी

मध्य रेल्वेवर ५ दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक; अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले, जाणून घ्या टाइमटेबल

Crime: चंद्रपूर हादरले! माहेरी आलेल्या विवाहितेची हत्या, घरात घुसून गळ्यावरून चाकू फिरवला

SCROLL FOR NEXT