Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : नशेखोरीसाठी गाड्या अडवून चाकूचा धाक दाखवत वसुली; दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Dhule News : धुळे शहरात साक्री रोड परिसरात ट्रॅव्हल्स चालक व वाहकास धारदार शास्त्राचा धाक दाखवून जबरीने वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील साक्री रोड परिसरात ट्रॅव्हल्स चालक व वाहकास धारदार शास्त्राचा धाक दाखवून जबरीने वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या दोघा सराईतांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून नशेच्या गोळ्या व औषधांसह रोख रक्कम व मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे,

धुळे (Dhule) शहरातील साक्री रोड परिसरात दोन जणांकडून २० मेच्या मध्यरात्री ट्रॅव्हल चालकांचा रस्त्यात अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून जबरन वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (Crime News) यानंतर ट्रॅव्हल चालकाने ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर या संदर्भात पोलिसांना माहिती देत हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर धुळे शहर पोलिसांनी तात्काळ यासंदर्भात ॲक्शन घेत पोलीस पथक संबंधित ठिकाणी रवाना केले.  

पोलिसांनी तपास करत सदर गुन्ह्यातील दोघा सराईतांच्या (Police) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या देखील पोलिसांना आढळून आल्या असून, हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले आहे. हे दोघेही नशाखोरी करण्यासाठी ही लूट करीत असल्याचे पोलीस तपासात उघकिस आले असून धुळे शहर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवादच झालेला नाही - उद्धव ठाकरे

Devisha Shetty: 'हिंसाचार म्हणजे लोकशाही नाही', सूर्यकुमार यादवच्या पत्नीची पोस्ट चर्चेत; CJP आंदोलनावर स्पष्ट केली भूमिका

Kanda Bhaji Recipe : १ थेंबही तेल न वापरता बनवा कुरकुरीत कांदा भजी, वापरा 'ही' सिक्रेट ट्रिक

Gold Price Today : सोनं खरेदी करायचंय? थांब आधी आजचे दर पाहा! सलग तिसऱ्या दिवशी किमतीत मोठा बदल

कमी वेळात झटपट बनवा नाश्त्याच्या 5 सोप्या रेसिपी, ऑफिससाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT