Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: उघड्यावर लघुशंका करताना हटकले; रागातून तरुणाला रस्त्यावरच आपटले, पुढे घडलं भयंकर

उघड्यावर लघुशंका करताना हटकले; रागातून तरुणास रस्त्यावर आपटले, तरुणाचा मृत्यू

भूषण अहिरे

धुळे : सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर लघुशंका करताना हटकल्याच्या रागातून 36 वर्षीय तरुणास रस्त्यावर आपटले. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिरपूर येथे रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. (Maharashtra News)

शिरपूर (Shirpur) शहरातील मराठा गल्ली येथे रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान संशयीत मनोज मराठे हा सार्वजनिक शौचालया बाहेर लघुशंका करीत (Dhule News) असल्याचे लक्षात आले. यानंतर, रामभाऊ माळी (वय 36) याने संबंधित मनोज मराठे यास उघड्यावर लघुशंका का करतो? असे म्हणत हटकले. याचाच राग मनात धरत मनोज मराठेने रामभाऊ माळी या तरुणास रागाच्या भरात रस्त्यावर (Crime News) आपटले. यात माळी हा गंभीररित्या जखमी झाला.

फरार संशयीत ताब्‍यात

यानंतर मनोज मराठे याने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ भगवान माळी यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्‍यास मयत घोषित केले. डोक्यात जबर मार लागल्याने भगवान माळी याचा घटनास्‍थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार असलेल्या मनोज मराठे या संशयीताच्या 24 तासाच्‍या आत पकळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने भाव दुप्पट

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT