Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation : ठाकरे गटाकडून रावणाची प्रतिकृती जाळून निषेध; विकास निधीत भाजपकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Dhule News : सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले

भूषण अहिरे

धुळे : धुळे महानगरपालिकेत विकास कामांसाठी आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. भाजपतर्फे या भ्रष्टाचार केलेल्या पैशांची आता नवरात्र उत्सवा दरम्यान निवडणुकीच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात उधळण केली जात असल्याचा आरोप शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने लावण्यात आला आहे. या संदर्भात ऊबाठा गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे. 

धुळे महापालिकेअंतर्गत (Dhule Corporation) करण्यात येत असलेल्या विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. या विकास कामांच्या दरम्यान मिळवलेली टक्केवारीतील पैसा हा सध्या निवडणुकीपूर्वी नवरात्र उत्सवामध्ये मंडळांना साड्या वाटून त्याच बरोबर देणगी स्वरूपात देऊन सत्ताधाऱ्यांतर्फे नागरिकांना प्रलोभित करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. असा आरोप शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने लावण्यात आला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले असून पालिका प्रवेशद्वारावरच भ्रष्टाचाराचा प्रतीकात्मक रावण रुपी बॅनर लावून या ठिकाणी रावण दहन (Shiv Sena) शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने करण्यात आले आहे.  

निवडणुकीत नागरिकांनी प्रतिउत्तर द्यावे 

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे रावण दहन करून नागरिकांनी प्रतिउत्तर द्यावे; असे आवाहन देखील आंदोलकांतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

SCROLL FOR NEXT