Dhule Corporation News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation News: आयुक्तांनाच हटवा; माजी स्थायी समिती सभापतींचे ठिय्या आंदोलन

आयुक्तांनाच हटवा; माजी स्थायी समिती सभापतींचे ठिय्या आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : शहरातील बेकायदेशीर स्मारक हटविण्याच्या मागणीवर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती आक्रमक झाले आहेत. याच दरम्‍यान त्‍यांनी (Dhule Corporation) धुळे महानगरपालिका (Dhule) आयुक्तांना हटवण्याची मागणी करत थेट महानगरपालिका प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले आहे. (Breaking Marathi News)

धुळे शहरातील चाळीसगाव रोडलगत असलेल्या टिपू सुलतान चौक स्मारक हे हठविण्यात यावे; या मागणीसाठी माजी स्थायी समिती सभापती आक्रमक झाले आहेत. धुळे शहराची शांतता भंग करण्यास महापालिका आयुक्त जबाबदार असल्याचे म्हणत महानगरपालिका आयुक्तांनाच हटवण्याची मागणी यावेळी आंदोलक सुनील बैसाने यांनी आंदोलनादरम्यान केली आहे.

तसेच पक्षश्रेष्ठींकडे देखील या संदर्भात मागणी करून धुळे महानगरपालिका आयुक्तांना हटवण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सुनील बैसाने यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी थेट धुळे महानगरपालिका प्रवेशद्वारावरच महानगरपालिका आयुक्तांना हटविण्याचे फलक झळकावत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आयुक्तांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल, थेट दिल्लीतून घडामोडींना वेग; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

Surya Gochar: सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार, ४ राशींना लागणार मोठा जॉकपॉट; नोकरीत होईल प्रगती

Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेची लाट! विदर्भ चाळीशीपार; अकोला, अमरावतीसह ८ शहरांमध्ये सर्वाधिक तापमान

SCROLL FOR NEXT