Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: आयुक्त दालनाच्या प्रवेशद्वारावर बांधली समस्यांची दहीहंडी; मनसेचे आंदोलन

आयुक्त दालनाच्या प्रवेशद्वारावर बांधली समस्यांची दहीहंडी; मनसेचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : दहीहंडीचा उत्सव देशभरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. परंतु धुळ्यात मात्र मनसेच्यावतीने अनोख्या पद्धतीने दहीहंडी (Dahi Handi) साजरी करण्यात आली आहे. धुळे (Dhule) शहरात असलेल्‍या समस्‍यांना हात घालत मनपा आयुक्‍त दालनाच्‍या प्रवेशद्वारावर समस्‍यांची दहीहंडी बांधून आंदोलन केले. (Dhule Corporation MNS News)

धुळे शहरामध्ये महानगरपालिका (Dhule Corporation) हद्दीमध्ये नागरिकांना खड्ड्यांचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा तसेच इतर बहुतांश अडचणींचा सामना रोजच करावा लागत आहे. यामुळे धुळे महापालिकेचा निषेध करण्यासाठी मनसेच्यावतीने (MNS) बालकृष्णाच्या हस्ते महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर समस्यांची दहीहंडी उभारण्यात आली आहे.

आयुक्‍तांनी फोडावी हंडी

पालिका प्रशासनातर्फे आयुक्त साहेबांनी ही दहीहंडी लवकरच फोडावी व धुळेकरांना समस्या मुक्त करावे; अशी मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्यांच्या दहीहंडीच्या माध्यमातून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित; महत्त्वाची माहिती समोर

Maharashtra Live News Update: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

कल्याणमध्ये महिलांचा राडा; मारहाणीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT