Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

करवाढी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी आक्रमक

करवाढी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : धुळे महापालिकेतर्फे पाच ते दहा टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विरोध करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी धुळे (Dhule) महापालिका प्रवेशद्वारावर मालमत्ता कर बिलांची होळी करून धुळे महानगरपालिका प्रशासनाचा व सत्ताधारी भाजपचा (BJP) निषेध केला आहे. (dhule corporation news ncp aggression in Dhule against tax hike)

औरंगाबाद, नाशिक (Nashik) या दोन्ही महापालिकेच्या तुलनेमध्ये धुळे महानगरपालिकेतर्फे (Dhule Corporation) वाढीव कर आकारला जात असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने लावण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या नगरसेवकांना या करवाढीचा विरोध करीत हा ठरावाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधात घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT