Police FIR 
महाराष्ट्र

राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांवर गुन्‍हे दाखल; धुळे मनपा विरोधात केले होते आंदोलन

राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांवर गुन्‍हे दाखल; धुळे मनपा विरोधात केले होते आंदोलन

Rajesh Sonwane

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरूवारी महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये शरम करो आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर बसून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले होते. लोक सेवकाने दिलेल्या आदेशाची अवहेलना केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलकांवर धुळे शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule-corporation-news-fir-filed-against-NCP-activists-agitation-was-against-Dhule-Corporation)

संपूर्ण शहरात एलईडी पथदिवे लावण्याचा ठेका धुळे महापालिकेने गुजरातमधील वल्लभ इलेक्ट्रिकल्सला तब्बल १३ कोटींना दिला आहे. जवळपास १७ हजार पोलवर हे लाईट बसविले जाणार होते. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदार आणि मनपातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमताने या ठेक्यात घोळ केला असून शहर अंधारात आहे. मनपात २१ कोटी रुपयांची लाईट खरेदी दाखविताना व्यवहारात अनियमितता असून लाईट बदलताना प्रत्यक्षात सुरु असलेले ८ हजार बल्ब काढण्यात आले. ते गेले कुठे? असा सवाल उपस्थित करुन हे बल्ब परस्पर विकले गेल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती. या आंदोलनानंतर धुळे शहर पोलिस ठाण्यामध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT