Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मनपा आयुक्त कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न; अतिक्रमणाला कंटाळला होता इसम

मनपा आयुक्त कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न; अतिक्रमणाला कंटाळला होता इसम

भूषण अहिरे

धुळे : महापालिका प्रशासनाला वेळोवेळी अतिक्रमण हटवण्यासंदर्भात निवेदन देऊन त्याचबरोबर विनंती करून देखील (Dhule) पालिका प्रशासन लक्ष देत नाही. धुळे महापालिका (Dhule Corporation) प्रशासनाच्‍या या कारभाराला कंटाळून सदर इसमाने आयुक्‍त कार्यालयातच गळफास लावून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला. (Latest Marathi News)

दीपक शंकरराव घाटोळे (वय ४६) असे संबंधित इसमाचे नाव आहे. शहरातील एकनाथ विजय व्यायामशाळेजवळ अतिक्रमण करण्यात आले असल्याचा आरोप यावेळी घाटोळे यांनी लावला आहे. धुळे महापालिकेकडे हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात उलट संबंधितास जाणीवपूर्वक मदत करीत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप लावत अखेर कंटाळलेल्या इसमाने धुळे महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोरच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांमुळे अनर्थ टळला

यावेळी सतर्क पोलिस कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळाला. पोलिसांनी तात्काळ संबंधित आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास ताब्यात घेतले व पालिका अधिकाऱ्यांनी संबंधिताच्या मागणीची दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT