Fire Saam tv
महाराष्ट्र

धुळे ब्रेकिंग..सुत गिरणीला आग; लाखोचा कापूस खाक

धुळे ब्रेकिंग..सुत गिरणीला आग; लाखोचा कापूस खाक

भूषण अहिरे

धुळे : शहरापासून जवळ असलेल्‍या जवाहर सुत गिरणीला अचानक आग लागल्‍याची घटना घडली. या आगीमध्ये जवळपास 14 ते 15 लाख रुपयांचा कापूस (Cotton) जळून खाक झाला आहे. (Dhule breaking news fires to the spinning mill Millions of cotton dust)

शहरापासून जवळ असलेल्‍या जवाहर सुत गिरणीला सकाळी अचानक आग (Fire) लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, गिरणीत कापूस असल्‍याने आगीने लागलीच रौद्र रूप धारण केले. पाणी टाकून आग (Dhule News) विझण्याचा प्रयत्‍न केला. मात्र कापूस पेटल्‍याने आग झपाट्याने वाढली. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही.

सुदैवाने जीवित हानी नाही

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या घटनेमध्ये सुदैवाने जीवित हानी टळली आहे. मात्र लाखो रूपयांचा कापूस जळून खाक झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT