Shirpur Accident Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Accident : बसची वाट पाहत उभ्या तरुणाला कारची धडक; तरुणाचा मृत्यू

Dhule News : गरताड (ता. शिरपूर) फाट्यावर झालेल्या या अपघातात कुणाल सुधाकर पाटील (वय २६) याचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अन्य दोन युवकही जखमी झाले

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : मुंबईला जायचे असल्याने बसथांब्यावर बस येण्याची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिली. यात तरुण वकीलाचा मृत्यू झाला. सदरची घटना १८ ऑगस्टला रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावर घडली.  

गरताड (ता. शिरपूर) फाट्यावर झालेल्या या अपघातात कुणाल सुधाकर पाटील (वय २६) याचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात (Accident) अन्य दोन युवकही जखमी झाले. कुणाल पाटील मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. त्याला काका सुरेश पाटील यांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास गरताड फाटा येथे सोडले. तेथून खासगी ट्रॅव्हल्स बसने तो मुंबईला जाणार होता. दरम्यान रात्री साडेबाराला दहिवद (ता. शिरपूर) येथून धुळ्याकडे जाणारे बोलेरो गाडी गरताड फाट्याजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्याला हुलकावणी दिली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुणालला जोराची धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला. 

तर कारमधील भूपेश मराठे व नीलेश सोनवणे हे जखमी झाले. अ‍ॅड. कुणाल पाटील याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्याला धुळे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे झाला. याबाबत सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चालक गौरव सुधाकर नवसारे (रा. नाशिक, ह.मु. मनुदादा पाटीलनगर, शिरपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्री महोदय जरा इथेही लक्ष द्या, रस्ते-वीज गुल, स्मार्ट सिटीच्या निव्वळ बाता

Navi Mumbai Crime: नेरूळ स्टेशनभोवती गुंडाराज; थेट पोलिसांवरच उचलला हात

Veg Pulao Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी खमंग व्हेज पुलाव, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: यवत मध्ये सुप्रिया सुळे यांनी थापल्या वारकऱ्यांसाठी भाकऱ्या

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद, इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा भडकला

SCROLL FOR NEXT