Dhule Accident News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident News: टेम्‍पोने हुलकावणी दिल्‍याने अ‍ॅपेरिक्षा उलटून दहा प्रवासी जखमी

टेम्‍पोने हुलकावणी दिल्‍याने अ‍ॅपेरिक्षा उलटून दहा प्रवासी जखमी

साम टिव्ही ब्युरो

धुळे : डोळे तपासणीसाठी धुळ्यात येणारी ॲपेरिक्षाचा शहरातील साक्री रोडवरील जे. के. ठाकरे हॉस्पिटलसमोर (Accident) उलटली. या अ‍ॅपे रिक्षातील दहा प्रवासी जखमी झाले असून त्‍यांना उपचारासाठी रूग्णालयात (Hospital) दाखल केले आहे. (Letest Marathi News)

लोहगड (ता. धुळे) येथून काहीजण अ‍ॅपेरिक्षाने डोळे तपासणीसाठी धुळ्यातील कस्तुरबा गांधी रुग्णालयात येत होते. मात्र, जे. के. हॉस्पीटलच्यासमोर अ‍ॅपेरिक्षाला टेम्पोने हुलकावणी दिल्याने अ‍ॅपेरिक्षा उलटली. या अपघातात दहा जण जखमी झाले. अपघाताची माहिती हेल्पलाईन क्रमांक १०८ ला कळवताच डॉ. शाह फैज, डॉ. शिवराज घोरपडे, जयेश पाटील, चालक अनिल थोरात अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन अपघातस्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे नेले.

अपघातातील जखमी

या अपघातात अशरफ माजिद पटेल (वय-६०), गौतमबाई भिकन पटेल (७०), सुशीलाबाई गंगाराम सोनवणे (४०), मुरलीधर भावराव (६२), द्वारकाबाई भीमराव अहिरे (५०), बापू गोपची (५५), अनिता भिल (४०), भाऊसिंग गंगाराम (६५) यांच्यासह दहाजणांचा जखमींमध्ये समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाफेड-एनसीसीएफचा कांदा चेन्नईकडे रवाना; मनमाडहून रेल्वेने लोडिंग सुरू

High Cholesterol Warning Sign: जर शरीराच्या या 3 भागांत भंयकर वेदना होत असतील तर व्हा सावध; कोलेस्ट्रॉल वाढल्याचे आहेत संकेत

Side Effects of Pomegranate: आरोग्यासाठी फायदेशीर डाळिंब पण ‘या’ ५ लोकांनी चुकूनही खाऊ नये; शरीराचे होऊ शकते नुकसान

Nepal Flood: '२० मिनिटांत पाणी पोहचेल ', नेपाळमध्ये पुन्हा महापूर येणार; ५ पट धोका वाढला, प्रशासनाकडून अलर्ट जारी

School Admission Age: मुलांना शाळेत कधी पाठवावं? योग्य वय ठरवताना लक्षात ठेवा ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT